गुलामाला गुलामीची प्रखरतेने जाणीव होणे हेच राज्याभिषेकाकडे नेणारे पहिले पण अत्यंत महत्वाचे पाउल असते.
मागच्या सोमवारी मी 4 आरसे आपल्या समोर मांडले. हे 4 आरसे म्हणजे चुकीच्या समजुतीं ज्या सर्वसामान्य मनुष्याला ‘गुलाम’ होण्यास भाग पाडतात. ज्यांनी माझा मागचा लेख वाचला आहे त्यांना हे आरसे कोणते हे माहितीच आहे. पण ज्यांनी नाही वाचला त्यांच्यासाठी:
- ‘आपल्यात काहीतरी कमी आहे’
- ‘आपण नेहमीच जिंकणार आहोत’.
- ‘I am not happy because of you.’
- ‘मीच(सर्वात चांगला/ली. सारे करतो/ते.केले पाहिजे, सारे निभावून नेतो/ते) तरी……..
पहिल्या दोन अरस्यांबद्दल मागच्या सोमवारी तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर, नातेवैकांबारोबेर चर्चा केलीच असेल. आता पुढच्या दोन चुकीच्या समजुतीन्बद्दल बघुयात.
3.‘I am not happy because of you.’
काही म्युझियम मध्ये ‘हसरे’ आरसे लावलेले असतात, त्यातले आपले प्रतिबिंब पाहिले की आपण खोखो हसतच सुटतो.पण या आरश्याचे उलटे आहे. याच्यात पाहिले की त्यातले प्रतिबिंब रडगाणेच गाते. याला आपण ‘रडका’ आरसा म्हणू शकतो.नॉर्मली या रडगाण्याच्या अंतऱ्याचे शब्द असे असतात :‘कळतंय,पण वळतच नाही’- ‘ हे सारे सारे जे घडते आहेना ते फक्त तुमच्या मुळे’ -‘काय करू ,माझे नशीबच फुटके’ -‘सारा नशिबाचा खेळ आहे’ आणि ‘Why me ?’
परवा जॉगिंग पार्क मध्ये मला माझी जवळची मैत्रीण भेटली. तसे खूपच दिवसांनी आम्ही भेटत होतो. आणि असे भेटल्यावर जो एक सहज प्रश्न विचारला असतो की काय कशी आहेस ? तसा मी विचारला. नॉर्मली या प्रश्नाचे उत्तर लगेचच ‘ठीक आहे, छान आहे’ वगैरे मिळते. पण तिने मात्र एक भला मोठा पॉज घेतला. आणि थोड्या वेळाने म्हणाली ‘Not happy’. मी चकितच झालो .नवरा CA , ही एका नामवंत शाळेत शिक्षिका, एकुलता एक गुणी मुलगा जो आता बाहेर शिकायला गेला आहे. घरी हे दोघेच. मग झाले काय happy नसायला?
ती: “ त्याचे असे आहे शंतनु,माझ्या शाळेतल्या जॉबचा मला जाम कंटाळा आलाय .माझे मन त्यात अजिबात रमत नाही.आता कुठे आम्ही मोकळे झालोत तर थोडे आपल्या मनाप्रमाणे जगावेसे वाटते.”
मी: “ अगं, मग अडलंय कुठे ? दे सोडून जॉब. मस्त जग मना सारखे”
ती: “ अरे पण स्वप्नील [ तिचा नवरा ] म्हणतो तुला आता दुसरे काही जमणार आहे का ? त्या पेक्षा जे सुरु आहे तेच सुरु ठेव”
मी: “ अगं, तुला काय जमणार आणि जमणार नाही हे तो कसा ठरवू शकतो ?. तू ठरव ना”
ती: “ अरे, खरं सांगू का , मलाच कळत नाहीये मी काय करू ?”
मी: “अगं, शाळा – कॉलेज मध्ये असताना तू फक्त आठव की तू काय काय करायचीस ? You name the activity, आणि त्यात तुझा हिरीरीने सहभाग असायचा. त्यातल्या कोणत्याही तू निवडू शकतेस. आणि तू आता तर फक्त चाळीशीची आहेस.”
ती: “ तू म्हणतोस ते बरोबर आहे. पण तेव्हाची मी आणि आताची मी.इतक्या वर्षांची gap.”
मी: “ परत नव्याने सुरु करण्यात पण एक प्रकारची मज्जा असते . आणि आता तुला कुठे नाव मिळवायचे आहे. कुणाशी स्पर्धा करायची आहे.फक्त आनंद घ्यायचा आहे.”
ती: “ सगळे कळतंय रे पण……स्वप्नील ना, तो यात अजिबातच involve होत नाही.त्याच्या दृष्टीने हा प्रॉब्लेमच नाही .तो म्हणतो की तुला पाहिजे ते कर .पण आनंदात राहा. आता हे त्याचे बरोबर आहे का ? मी आता एकटीने कशी सुरुवात करू जर त्याची मला साथच नाही”
मनातल्या मनात मी कपाळाला हात लावला. मनात आले की हिच्या बरोबर योगाच्या क्लासला हा काय तिच्या चपला सांभाळत बसणार आहे. मी ओळखले की हे बोलणे तासभर जरी चालले असते तरी त्यातून काहीही साध्य झाले नसते .तिला बरं वाटण्यासाठी काहीतरी बोलणे गरजेचे होते.
मी: “खरं आहे तुझे , अगदी एकटी पडली आहेस.”
ती: “ हो ना ? आणि बघ ना हे सगळे माझ्याच नशिबी .बाकीचे सर्व छान मजेत जगत आहेत.कुणाला काही पडली आहे का ? म्हणून मी मगाशी म्हणाले ‘not happy’.”
इथे एक स्त्री आहे याचा अर्थ असा नाही हा फक्त स्त्रीचा प्रश्न आहे. पुरुषांमध्ये पण ही मानसिक असहाय्यता भरपूर प्रमाणात आढळून येते.आपल्या नकारात्मक सद्यस्थितीचे खापर दुसऱ्यावर, परिस्थितीवर,नशिबावर ढकलणाऱ्या व्यक्तींचा हा आरसा आहे. आणि समाजात हा घटक मुबलक आहे. तुमचे काय ?
4. ‘मीच(सर्वात चांगला/ली. सारे करतो/ते केले पाहिजे, सारे निभावून नेतो/ते) तरी……..
माझ्या पूर्वीच्या कंपनीतल्या एका मित्राचा मला मध्ये फोन आला. तसा लहान आहे माझ्याहून .मी सोडायच्या वेळेस तो नुकताच जॉईन झाला होता . पण छान हुशार आणि कर्तबगार होता. थोड्याच दिवसात त्याने आपली ओळख निर्माण केली होती.त्याला मला भेटायचे होते. कधी येऊ विचारत होता . मी विचारले “सहज का काही काम?” त्यावर तो उत्तरला खूप अर्जंट काम आहे. मी म्हणालो “ये मग लगेच , मी मोकळाच आहे.” तो सध्या सिनिअर इंजिनिअर पदावर आहे एवढेच मला माहित होते. स्वारी आली लगेचच . पाहतो तर काय माझ्या मित्राची सगळी रयाच गेलेली. चेहरा तणावपूर्ण. डोळ्याखाली काळी वर्तुळे . बोलण्या-बसण्यातली पूर्वीची ऐट आणि विश्वास गेलेला. काही वर्षांपूर्वीचे हे तडफदार आणि कार्यक्षम व्यक्तिमत्व एकदम असे मलूल का झाले असावे हा प्रश्न माझ्या मनात डोकावून गेला. तेवढ्यात त्याने घडाघडा बोलायला सुरुवात केली.
“ शंतनु, दहा-बारावर्षांपूर्वी मी जेव्हा जॉईन झालो तेव्हा काहीतरी करून दाखवत पुढे जायची उर्मी होती. आणि त्या उर्मीत पडेल ती जबाबदारी , येतील ती आव्हाने स्वीकारत गेलो. आणि माझ्या सुदैवाने म्हणा व कष्टांनी म्हणा मला अपेक्षित यश पण मिळत गेले. मग कंपनीने पण माझ्यावरची जबाबदारी वाढवत नेली. प्रमोट केले. इथपर्यंत सारे ठीक होते. कारण माझ्याबरोबर एकदोनच asistants असायचे. पण मग टीम मोठी होत गेली. दोन जणांच्या जागी वीस पंचवीस जण झाले.आणि तिथून माझी गडबड सुरु झाली.आतापर्यंत मला प्रत्येक वेळी अपेक्षित रिझल्ट्स मिळत होते त्यामुळेनकळत सगळ्यात जास्त मलाच कळते , मी सांगितल्याप्रमाणेच आणि मला विचारूनच प्रत्येक गोष्ट व्हायला पाहिजे असे आग्रह मी धरत गेलो. आणि त्यामुळे Things became worst. अगदी छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा माझ्यासाठी थांबायला लागली.आधी मला त्याचे अप्रूप वाटायचे.माझा इगो सुखावला जायचा. पण ही गोष्ट Boomrang झाली. मी सांगेन तेवढेच काम होऊ लागले. निर्णय कुणीच घेईनात. सगळे माझ्यावर ढकलून मोकळे व्हायला लागले. आणि मला अपयश नको असल्याने सारे ओझे मी माझ्या डोक्यावर घ्याला लागलो. प्रत्येक बारीकसारीक गोष्टीत लक्ष घालायला लागलो. आणि अजून खोलखोल गाळात रुतत गेलो. आता हे गाडे माझ्या एकट्याने खेचले जात नाही. माझ्या हाताखाली लोक असून माझ्या बरोबर कोणी नाही अशी अवस्था आहे.आणि वरचे लोक म्हणतात की तुमच्या हाताखाली सर्वात मोठी टीम आहे तरी का रिझल्ट्स दिसत नाहीत ?. आता मी काय करू सांग?”
हा Super [woman – Supermom – Manager -man -father] आणि हो सुपर सासूसासरे [ old angry men आणि women] यांचा आरसा आहे.यात पाहिले की तुमच्यापेक्षा जास्त कार्यक्षम लोकांचे, यशस्वी लोकांचे चेहेरे दिसतात. मग तुम्ही अजून जोरात पळायला लागता. आणि मग जेव्हा धाप लागते तेव्हा पाणी द्यायला ,पाठीवरून हात फिरवायला कुणीच नसते कारण सतत पळत तुम्ही सर्वांच्या पुढे असता. एकटे असता.कंपनीतच नाही तर हल्ली घराघरात असे हिरो हिरोइन्स दिसतात.या सर्वांना असेच वाटत असते की सारे जे चालले आहे , चालणार आहे ते केवळ आणि केवळ आपल्यामुळेच. जी काही अक्कल आहे ,जी काही जबाबदारीची जाणीव आहे ती केवळ आणि केवळ आपल्यालाच. पण अशांचे जगणे फार stressfull होते. Perfection चा आग्रह ,मीच सगळे चांगले करू शकतो/ शकते आणि माझ्या तालावरच जगाने नाचावे ही भावना त्यांना साधे दोन श्वास शांतपणे ,सुखाने घेऊ देत नाही.
तुमचे काय ? शेवटी करा विश्लेषण, ह्या चार पैकी तुम्ही कोणत्या आरस्यामध्ये तुमचे प्रतिबिंब बघता आहात!
खालच्या comment box मध्ये लिहा …बघा कशी मजा येईल प्रत्येकाची उत्तरं वाचून ..चला भेटू पुढच्या सोमवारी..!
शंतनु